बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी बाधित रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात बुधवारी ३,२१८ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर १,२७९ नवीन रुग्णांची भर पडली. दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या २३,०५६ वर पोहोचली आहे.
राज्यात एकूण कोरोना रूग्णांची संख्या ८,९६,५६३ वर पोहोचली. यापैकी ८,६१,५८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. म्हणजेच राज्यातील ९६.०९ टक्के संक्रमित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण ११,९०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २० मृत्यूंची नोंद बुधवारी झाली. राज्यात मृत्यूचे प्रमाण आता १.३२ टक्के आहे. तर आयसीयूमध्ये २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने राज्यात गेल्या २४ तासांत १,०१,०५८ नमुन्यांची तपासणी केली ज्यात १५,२८६ रॅपिड अँटीजेन्स आणि, ८५७७२ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.
दरम्यान राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. बुधवारी जिल्ह्यात ७२८ रुग्ण सापडले. जिल्ह्यात आतापर्यंत संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ३,७५,८९१ वर पोहोचली आहे. यापैकी ३,५४,००४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. सध्या जिल्ह्यात १७६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोविडमुळे आतापर्यंत ४२१० रूग्णांचा मृत्यू केला आहे. यापैकी बुधवारी १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.









