बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकला मंगळवारी काही अंशी दिलासा मिळाला. तर राज्यात ६,२५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग तिसर्या दिवशी बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तर ११० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
रविवारी कोरोनावर मात करून ४०७७ लोक घरी परतले, तर सोमवारी ४७७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मंगळवारी ६,७७७ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याच वेळी, राजधानी बंगळूरमध्ये कोरोनाचे २०३५ नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ७३,८४६ इतकी आहे.
राज्यात ११० रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी राज्यात कोरोना-संसर्ग झालेल्या एकूण ११० रुग्णांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी बेंगळूरमधील ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३४०२१ आहे. मंगळवारी ४२७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ११३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









