बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या कमी जास्त होताना पहायला मिळत नाही. मंगळवारी राज्यात कोरोना संसर्गाची ६,९७४ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्याच वेळी रुग्णलयांतून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. मंगळवारी राज्यात ९,०७३ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात मंगळवारी ८३ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.
दरम्यान राजधानी बेंगळूरमध्ये मंगळवारी ३,०८२ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९३,१५३ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी राज्यात ५५,७०७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.









