बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकात कोरोना संक्रमणाची ७,३३९ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. राज्याला दिलासा देणारी बाब म्हणजे सोमवारी ९९२५ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९५,३३५ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी राज्यात ४२,६९१ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.
सोमवारी गेल्या चोवीस तासात राज्यात एकूण १२२ कोरोना-संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला, त्यापैकी ३२ जणांचा बेंगळूरमध्ये मृत्यू झाला आहे. तर बेंगळूरमध्ये सोमवारी २,८८६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.