बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा धोका कायम आहे. गुरुवारी, गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोना संसर्गाची ७,३८५ नवीन प्रकरणे नोंदली गेली. बेंगळूरमध्ये सर्वाधिक म्हणजे २,९१२ नवीन रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी राज्यातील ६,२३१ रूग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोनाचे ८२,१४९ रुग्ण उपचारात आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात १०२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २५ बेंगळूरमधील आहेत.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या गुरुवारी ३४,१८६ वर गेली. जिल्ह्यात १,९८१ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत१,६१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.









