मंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सरकार कर्नाटकमधील आणखी पाच ठिकाणी हेअवजड वाहन ड्रायव्हिंग संस्था (एचव्हीडीआय) सुरू करणार असल्याचे सांगितले.
शनिवारी येथे जवळील बंटवाळ तालुक्यातील कांबलापाडाव येथे एचव्हीडीआयच्या उद्घाटनानंतर सवदी यांनी राज्याच्या वित्त विभागाने प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्च करून आणखी पाच ठिकाणी अशा संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले. होळलकेरे येथील संस्थेचे लवकरच उद्घाटन होणार आहे. सध्या बेंगळूर आणि धारवाडमध्ये अशी दोन केंद्रे आहेत.
एचव्हीडीआयच्या महत्त्वावर मंत्री सवदी दरवर्षी देशात अंदाजे दीड लाख रस्ते अपघात होतात. म्हणूनच, सर्व वाहनचालक, विशेषत: जड वाहने चालविणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
चालकांना योग्य प्रशिक्षण देऊन जड वाहनांमुळे होणार्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ही संस्था स्थापन केली गेली आहे. आपल्या लक्षात आले आहे की लोक परदेशात नियमांचे काटेकोरपणे पालन करतात, जेथे वाहनचालकांना ‘पायलट’ म्हणून नियुक्त केले जाते. अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी आम्हाला वाहनचालकांना योग्य मार्गाने प्रशिक्षण देणे देखील आवश्यक आहे, असे सवदी म्हणाले.









