बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री सुरेश यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस मी घरी राहणार आहे. लक्षणे नसल्याने घाबरून जाण्याची चिन्हे नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मंत्री सुरेश यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना तपासणी व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान अधिवेशनात हजेरी लावलेल्या आमदारांपैकी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील आणि दिनेश गुंडू राव यांच्यासह नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, भाजप राज्यसभा सदस्य अशोक गस्ती आणि बसवकल्याण कॉंग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.