बेंगळूर \ ऑनलाईन टीम
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १७ एप्रिलला त्यांनाा कोरोनाची लागण झाली होती. यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, आता माझी प्रकृती उत्तम आहे. आज मी कॅबिनेट बैठक देखील घेणार आहे. बीएस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांचा कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली होती.
७८ वर्षीय बीएस येडियुरप्पा यांना गेल्या वर्षीही कोरोनाची लागण झाली होती. ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलीलाही कोरोना झाल्यानं रुग्णालयात भरती केलं होतं. योग्य उपचाराअंती दोघांनी कोरोनावर मात केली आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं होतं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









