बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोरणाची लागण झाल्यांनतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोना चाचणी करून घेतली यामध्ये त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. पण ते स्वत: इतरांपासून काही दिवस अलग राहणार आहेत.
ईश्वरप्पा यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली होती. चाचणीनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनतर खबरदारी म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. चाचणीनंतर यासर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ईश्वरप्पा यांनी “मी आणि माझ्या कुटुंबाने कोव्हीड -१९ ची चाचणीत करून घेतली यामध्ये आमचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे, ”असे ते म्हणाले.
मंत्र्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह 21 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पण ईश्वरप्पा यांनी आम्ही स्वेच्छेने घरी अलग राहणार असल्याचे म्हंटले आहे.









