बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री बी.सी. पाटील व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना चाचणीनंतर त्यांचा व त्यांची पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर मंत्री पाटील यांना घरामध्ये अलग ठेवण्यात आले आहे. मंत्री पाटील यांनी त्यांच्यात व त्यांच्या पत्नीमध्ये कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याचे म्हंटले आहे.
आपण लवकरच बरे होऊन व पुन्हा काम करण्यासाठी परत येईन असा आत्मविश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. दुसर्या ट्वीटमध्ये पाटील यांनी आपला जावई देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हंटले आहे.
पाटील यांच्या आधी वनमंत्री आनंदसिंग आणि पर्यटनमंत्री सी.टी. रवी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय मंड्या येथील अपक्ष खासदार सुमालता यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे.









