बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये स्वत: ला संसर्ग झाल्याची माहिती दिली. कोरोनाच्या आगामी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी केल्यावर उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी मी काही दिवस घरी एकांत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याची व कोरोना तपासणी करून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.









