बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना आणि सलग दुसऱ्या वर्षी पुराचा सामना करायला लागलेल्या पूरग्रस्त राज्यांना केंद्र सरकारने ४ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्य रकमेची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. पंतप्रधानांनी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून योग्य मदत उपाय तसेच आर्थिक मदतीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरात ज्यांनी आपला जीव गमावला त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि त्यांनी, पूरग्रस्त भागातील लोकांचे जीवन व संपत्तीचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे म्हंटले.
राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री आर. अशोक आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केले. कोरोना बाधित मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या अनुपस्थितीत दोन्ही वरिष्ठ मंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील सरकारने घेतलेल्या पावसाबद्दल माहिती दिली. यादरम्यान, यावेळी दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडून विशेष सहाय्य जाहीर करण्यावर जोर धरला.