बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा करत कर्नाटक सरकारने शिखा सी. यांची राज्याच्या वाणिज्य कर विभागाच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बेंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.
दरम्यान, कोप्पळ जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रघुनंदन मूर्ती यांची बेंगळूर वाणिज्य कर (अंमलबजावणी) अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. कर्नाटक रेशीम उद्योग महामंडळाचे एमडी कानगावल्ली एम. आता कर्नाटक लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारतील.
अन्य आयएएस अधिकारी बदली (त्यांच्या नवीन पदनामांसह):
डॉ अजय नागाभूषण एम. एन. (सचिव, नगरविकास विभाग, बेंगळूर)
सलमा के. फहीम (अतिरिक्त सचिव, पायाभूत सुविधा विभाग)
रमया एस. (कार्यकारी संचालक, कर्नाटक परीक्षा प्राधिकरण)
अर्चना एम. एस. (सदस्य, कर्नाटक अपीलीट न्यायाधिकरण, बेंगळूर)









