बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी गुरुवारी बेंगळूरमध्ये कार्मिक व प्रशासकीय सुधारण विभागा (ई-गव्हर्नन्स) द्वारा विकसित केलेल्या डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) सेवेचा शुभारंभ गुरुवारी केला.
डीपीआरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १२० योजनांचा या व्यासपीठामध्ये समावेश करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून आधारशी जोडल्या गेलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात १२ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये थेट जमा झाले आहेत. मुख्यमंत्री, येडीयुरप्पा म्हणाले, “या प्रणालीने याआधी होणार गैरप्रकार बंद झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान सरकारने जाहीर केलेले सर्व पॅकेजेस या व्यासपीठाद्वारे देण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यात आर्थिक सहाय्य देणाऱ्या सर्व योजना डीबीटी प्लॅटफॉर्म अंतर्गत आणल्या जातील, असेही ते म्हणाले.









