बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. वाढती कोरोना संख्या, मृत्यू आणि आरोग्य यंत्रणा यापार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जिल्हा प्रशासक व उच्च सरकारी अधिकाऱ्यांना बूथ-स्तरीय टास्क फोर्स मजबूत करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आणि संपर्कांची कार्यक्षमतेने ओळख पटविणे यासारख्या अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. कोरोना देशभरात वेगाने पसरत असून राज्यातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोना तपासणी करण्यासाठी पर्याप्त चाचणी उपकरणे उपलब्ध करुन देणे आणि आवश्यक असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करणे (साथीचा रोग) आवश्यक असून कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी या सर्व प्रयत्नांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.
राज्यात ८ मार्चपासून एकूण ४,३०,९४७ कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १० सप्टेंबर रोजी राज्यात कोरोनाची १,०१,५३७ सक्रिय प्रकरणे आहेत.