बेंगळूर/प्रतिनिधी
देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम प्रथमदर्शी कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. दरम्यान कर्नाटकातील आरोग्य कर्मचारी आणि प्रथमदर्शी कर्मचार्यांसह १६ लाखाहून अधिक लोकांना पहिल्या टप्प्यात कोरोना ही लस जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सोमवारी दिली.
दरम्यान आरोग्यमंत्री सुधाकर यांनी भारतीय कंपन्यांनी विकसित केलेल्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लस विनामूल्य दिल्या जातील. संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाईल, असे ते म्हणाले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती, ज्यात आरोग्यमंत्री सुधाकर आणि मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा उपस्थित होते.
ही लस दोन डोसमध्ये दिली जाईल. पहिल्या डोसनंतर, आणखी एक डोस २८ दिवसांनंतर दिला जाईल. तर ४५ दिवसांनी प्रतिकारशक्ती विकसित होईल, असे सुधाकर यांनी स्पष्ट केले. तसेच काही दिवस काळजी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.