वृत्तसंस्था / बार्बाडोस
विंडीजचा क्रिकेट संघ या महिन्यात पाकच्या दौऱयावर जाणार आहे. दरम्यान विंडीजच्या वनडे संघाचा कर्णधार किरॉन पोलार्ड या दौऱयासाठी दुखापतीमुळे उपलब्ध होवू शकणार नाही, असे विंडीज क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना पोलार्डला स्नायु दुखापत झाली होती.
विंडीज संघाच्या पाक दौऱयाला 13 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दौऱयात विंडीज आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका तसेच तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. 2021 च्या क्रिकेट हंगामामध्ये यापूर्वी इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांचे पाक दौरा यशस्वी झाल्याने आता पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पाहण्याची संधी शौकिनांना उपलब्ध होत आहे. कर्णधार पोलार्डची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. पाक दौऱयासाठी घोषित करण्यात आलेल्या विंडीजच्या टी-20 संघाचे नेतृत्व निकोलास पूरनकडे सोपविण्यात आले असून वनडे संघाचे नेतृत्व शाय होप करणार आहे.









