कसबा बीड / प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये कर्जमाफी देण्यात द्यावी यासाठी कसबा बीड ते कलेक्टर ऑफिस 1 नोव्हेंबरला पायी दिंडी आंदोलन आयोजित केले असुन केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन शेतकरी आंदोलक मुकुंद पाटील यांनी केले .
कसबा बीड येथे पत्रकाद्वारे माहिती देताना पाटील यांनी सर्वसामान्य शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यासाठी ईमेल द्वारे आपण मुख्यमंत्री व प्रशासकांना वेळोवेळी माहिती दिल्याचे सांगितले . त्याचे प्रत्युत्तरही आपणास ईमेल द्वारे मिळाली असली तरी शासकीय धोरणामुळे त्यात विलंब होत आहे असंही ते म्हणाले.
अधिक माहिती देताना पुढे ते म्हणाले कसबा बीड ते मंत्रालय पायी दिंडी आंदोलन नियोजित होते पण कोरोना महामारीमुळे ते कसबा बीड ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस असे नियोजीत केले आहे .शेतकरी अडाणी नाही तर शासनप्रणाली चुकीचे आहे. विक्री व्यवस्थेत बदल करुन शेतीमालास योग्य हमीभाव मिळावा व व्यापारी बिले वेळेत मिळावी असे झाल्यास शेतकरी अडचणीत येऊ शकत नाही.शेतकरी कर्जमाफीसह पिक कर्ज, शेतीसाठी 24 तास वीज, महिला बचत गटाच्या कृषीकर्ज माफ, पेट्रोल,डिझेल,गॅस आणि रासायनिक खते यांचे दर कमी करावेत ,स्वामीनाथन शिफारस लागु करावी यासाठीही सरकारकडे साकडं घालणार आसल्याच पाटील यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









