डॉ. पेयो नावाने प्रसिद्ध घोडा
पायांनी इशारा करून कुठल्या रुग्णाला भेटायचे हे सांगतो
फ्रान्सच्या कॅलिस रुग्णालयात कर्करोगाशी लढणाऱया रुग्णांना ‘डॉ. पेयो’ दररोज दिलासा देण्यासाठी पोहोचतात. डॉ. पेयो एका घोडय़ाचे नाव असून त्याला हसन बूचकोर यांनी विशेष स्वरुपात रुग्णांच्या सेवेसाठी प्रशिक्षित केले आहे.
रुग्णांच्या असहय़ वेदनेला कमी करण्यासाठी पेयो ‘डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध झाल आहे. पेयो 15 वर्षांचा असून तो पायांच्या इशाऱयाने कुठल्या रुग्णाच्या खोलीत जायचे आणि किती वेळ थांबायचे हे सांगतो. रुग्णाला कर्करोग आहे का टय़ूबल हे पेयोला समजत असल्याचा दावा हसन यांनी केला आहे.
रुग्णांसोबत वेळ घालवतो

घोडा बहुतांश वेळ रुग्णालयात रुग्णांसोबत घालवतो. रुग्णालय प्रशासनाच्या अनुमतीमुळे आम्ही रुग्णांपर्यंत जातो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतो. रुग्ण पेयोचे लाड करतात, पेयो देखील त्यांना तितक्याच प्रेमाने प्रतिक्रिया देतो. अशा प्रकारे त्या लोकांचा त्रास काही वेळासाठी का असेना पण कमी होतात असे हसन यांनी म्हटले आहे.









