महिलांकडे ब्राउन रंगाचे कपडे फारसे नसतात. आपण हा रंग कॅरी करायला थोडं कचरतोच. पुरूषांच्या वॉर्डरॉबमध्ये ब्राउन्स अगदी छान मिरवत असताना महिला मात्र त्यापासून चार हात लांब राहतात. ब्राउन रंगाचेही विविध टोन्स आणि शेड्स आहेत. योग्य पद्धतीने कॅरी केला तर ब्राउनही खूप छान दिसतो.
तुमच्या वॉर्डरॉब आणि स्टाईलला चॉकलेटी मेकओव्हर देण्यासाठी काय करता येईल, याविषयी…
- ब्राउन्स न्यूट्रल शेडसोबत ट्राय करा. गडद ब्राउन रंगाचे कपडे व्हाईट, क्रीम किंवा ऑफ व्हाईटवर खुलून दिसतात. न्यूट्रल शेड्सच्या डिझाईन्समध्ये प्रयोग करता येतील. पोलका डॉट्स, ट्राईप्स किंवा छोटय़ा प्रिंट्सची निवड करा. परफेक्शनसाठी गडद ब्राउन रंगाला साजेशी लिपस्टिक लावा.
- ऑल व्हाईट किंवा ब्लॅकप्रमाणे ऑन ब्राउन लूक कॅरी करता येतो. पण यासाठी योग्य छटांची निवड करायला हवी. संध्याकाळच्या रीच लूकसाठी टॅन, रस्ट किंवा कॅमल ब्राउन निवडा. तर सकाळसाठी न्यूड, बेच असे ऑप्शन्स आहेत. सिल्की फॅब्रिक्स,स्लीप ड्रेस किंवा जंपसूट चालून जातील. गडद ब्राउनवर गोल्डन ऍक्सेसरीज आणि न्यूड पादत्राणं कॅरी करता येतील.
- कॉफी ब्राउन रंग खूप छान दिसत असला तरी त्याचा अतिवापर तुमच्या लूकचा विचका करू शकतो. तुम्ही कॉफी किंवा फज ब्राउनच्या फॅन असाल तर हे रंग ऍक्सेसरीजच्या रूपात वापरा. ब्राउन पादत्राणं, लेदर जॅकेट, स्कार्फ किंवा ब्लेझर कॅरी करा.
- ब्राउन रंगाच्या शेड्स मिक्स मॅच किंवा लेअरिंग करून वापरता येतील. एकमेकांना पूरक ठरणार्या शेड्सची निवड करा. एका वेळी दोन किंवा तीन शेड्ससोबतच प्रयोग करा.
- टॅन, कॅमल, कॉपर, ब्राँझ, हॅझल, रस्ट, कॅरेमल, टॉफी, कॉफी, बेरी ब्राउन आणि कोका अशा ब्राउन कुटुंबातल्या असंख्य छटा आहेत. या रंगांचा खुबीने वापर करा.
- ब्राँझ रंगाकडे थोडं दुर्लक्ष झालं असलं तरी तो तुम्हाला रॉयल लूक देतो. एथनिकसाठी ब्राँझ खूप चांगला पर्याय आहे. ब्राँझ शेडची पादत्राणं किंवा ऍक्सेसरीजही शोभून दिसतात.
- ब्राउन कपडे नको असतील तर ऍक्सेसरीज वापरा. ब्राउन पादत्राणं, बेल्ट, क्लच, पर्स, बॅग्ज खरेदी करा. ब्राईट शेड्सच्या ड्रेसवर टॅन, कॉफी किंवा न्यूड पादत्राणं चालून जातील. कॅज्युअल लूकसाठी ब्राउन बेल्ट कॅरी करा. ब्राउन शेडमधल्या लिपिस्टिक्सचा ऑप्शनही तुमच्याकडे आहे.









