कोकरूड/प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील हत्तेगाव ते शेडगेवाडी रस्ता पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक थांबून लोकांना त्रास होत आहे. या गोष्टीची दखल प्रशासनाने न घेतल्याने माजी जि. प.सदस्य रणधीर नाईक, सत्यजित देशमुख व ग्रामस्थांनी हत्तेगाव फाटा येथे कराड- रत्नागिरी राज्यमार्ग सुमारे २ तास रोखुन धरला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवकर यांनी रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला.
हत्तेगाव फाटा ता. शिराळा येथे कराड – रत्नागिरी महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, पं. स.सदस्य संपतराव देशमुख,हत्तेगाव सरपंच रेखा पाटील,उपसरपंच संदीप चोरगे, बाजीराव शेडगे, दिनकर शेडगे, मनोज चिंचोलकर, नथुराम सावंत आदींसह महिलावर्ग व शेतकरीवर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.