कृषी आंदोलनात उतरल्यानंतर कारवाई
प्रतिनिधी / कराड :
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराडच्या कोल्हापूर नाक्यावर शेतकरी संघटनांनी शनिवारी तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनाला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी उपस्थिती लावली. आंदोलनात घोषणाबाजी करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामधे सत्वशिला चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
दिल्ली येथे शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभर आंदोलने सुरू आहेत. कराडच्या कोल्हापूर नाक्यावरही आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण या सहभागी झाल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी चव्हाण यांनाही पोलीस गाडीतून पोलीस ठाण्यात नेले. पत्रकारांशी बोलताना सत्वशिला चव्हाण म्हणाल्या, केंद्र सरकार शेतकरी हिताच्या विरोधात आहे. आज या आंदोलनात मी एक शेतकरी म्हणून सहभागी झाले आहे. शेतकरी आंदोलनाचा विचार सरकारने करायची गरज आहे. मात्र शेतकरी वर्गाचे काहीही ऐकले जात नाही.









