सातारा /प्रतिनिधी
कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या म्हासोली ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षांची मुलगी, उंब्रज येथील 22 वर्षीय युवक आणि 53 वर्षीय पुरुष असे एकूण चार कारोना बाधित रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
या चार रुग्णांची 14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे बाधित रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या चार जणांना मंगळवारी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्ह्यात 336 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 जण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे
Previous Articleक्वारंटाईन असलेल्या तरुणाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
Next Article अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर








