प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर सुमारे 9 महिन्यांनी प्रथमच विश्वविक्रमी वऱहाड निघालंय लंडनला या नाटकाचा प्रयोग सोमवार 25 जानेवारीला सायंकाळी 7.30 वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आयोजित करण्यात आला आहे. तर मंगळवार 26 रोजी सायंकाळी 4.30 वाजता भावे नाटय़ मंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.
मराठी माणुस हा नाटक वेडा आहे, असे म्हटले जाते. तो नाटक, शास्त्राrय गायन-वादन, नृत्य इत्यादी कलाप्रकारांचा मनापासून आस्वाद घेत असतो. परंतु मागील 11 महिन्यांपासून उद्भवलेल्या कोरोनाच्या अडचणीमुळे तो अशा कार्यक्रमांच्या लाईव्ह मनोरंजनास मुकला होता. परंतु या कालावधीत त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून मनोरंजनाची भूक भागवली. त्यात लाईव्ह परफॉर्मसची मजा नव्हती. तब्बल 9 महिन्यानंतर शासनाने 50 टक्के उपस्थिती व काही अटी-शर्थीने पुन्हा एकदा लाईव्ह कार्यक्रमास नोव्हेंबर महिन्यापासून परवानगी दिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून मुंबई व पुणे येथे नाटक, गायन व लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम हाऊसफुल गर्दीत धुमधडाक्यात सादर झाले. परंतु सांगली व कराडमध्ये अद्यापही कोणतेच व्यावसायिक नाटकाचे प्रयोग झालेले नाहीत. कराड व सांगली येथे लॉकडाऊननंतर प्रथमच 25 व 26 जानेवारीला या नाटकाचे प्रयोग आयोजित केलेले आहेत. मराठी रंगमंचावर विक्रमादित्य ठरलेले व मराठवाडय़ाचा वैशिष्टय़पूर्ण गंध घेऊन विश्व भ्रमंती केलेले आणि गिनीज बुकने एकदा नाही तर तब्बल दोनदा दखल घेतलेले व डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनानंतर मराठवाडय़ातील हरहुन्नरी कलाकार संदीप पाठक यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि वऱहाडला पुन्हा वैभवाचे क्षण मिळवून दिले. मराठी रसिकांची इच्छा आणि आणि डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची कलाकृती जिवंत राहावी या दृष्टीने संदीप पाठक यांनी केलेल्या या धाडसी प्रयोगाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि आणि अवघ्या काही वर्षातच आता या नाटकाने पाचशेव्या प्रयोगाकडे गरुड झेप घेतलेले घेतलेली आहे. अशा या विश्वविक्रमी नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन कराड व सांगली येथे करण्यात आलेले आहे.








