प्रतिनिधी / कराड
कराड तालुक्यात बिबट्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात आज दोन बिबट्यांनी हल्ला करून मेंढपाळासमोरच दोन मेंढ्या ठार केल्या. तर श्वानासह एक मेंढी गायब केली. जखिणवाडी ता. कराड येथील वाघुरदरा नावाच्या शिवारात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पाळीव प्राण्यांवर भरदिवसा हल्ला होत असल्यामुळे जखिणवाडी विभागात बिबट्याची दहशत कायम आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, आगाशिव डोंगर पायथ्याला जखिणवाडी गावापासून कांही आंतरावर वाघुरदरा नावाचा शिवार आहे. या शिवारात नितीन तुकाराम पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या शेतात जखिणवाडी येथील राजेंद्र भिकू येडगे हे मेंढरांचा कळप चारायला घेऊन जातात. असतो. नेहमीप्रमाणे आज येडगे मेंढ्या चारत असताना अचानक पाळीव श्वान भुंकत असल्याचे निदर्शनास आले. येडगे त्या दाशेने गेले असता दोन बिबट्यांनी श्वानासह मेंढरांवर हल्ला चढवला होता. क्षणार्धात दोन मेंढ्यांच्या नरड्याचा चवा घेऊन ठार केल्याचे निदर्शनास आले. एकाने एक मेंढी तर दुसऱ्याने श्वान घेऊन डोंगरात धुम ठोकली. यावेळी नरड्याचा चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली होती. दोन बिबट्यांना पाहून येडगे यांनी घाबरून गावात फोन केला. गावातील ग्रामस्थांनी घटनेची खबरयेडगे यांनी खबर वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे , वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी मेंढीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले उपचार सुरू असताना सायंकाळी ती मेढीही ठार झाली. मेंढपाळासमोरच बिबट्याने हल्ला केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात बिबट्याचा सततचा वावर असल्यामूळे आगाशिव डोंगर पायथ्याच्या गावात बिबट्याची दहशत कायम आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









