प्रतिनिधी / कराड
कराडमधील उपजिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र बँकेच्या समोर शस्त्रांचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणार्या दोघांना कराड शहर पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराडातील उपजिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र बँकेच्या समोर बुधवारी रात्री दोघा संशयितांनी शस्त्रांचा धाक दाखवून एका प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील ऐवज लुटला. त्या प्रवाशाने तात्काळ या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतिश जाधव, प्रफुल्ल गाडे यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी अधिक माहिती घेऊन त्यांचा शोध घेऊन रात्री त्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









