प्रतिनिधी / कराड
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने शववाहिका खरेदी केली आहे. त्याचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी नगरपालिकेत झाले. पालिकेने रूग्णवाहिकाही खरेदी केली आहे. नागरिकांच्या सोईसाठी शववाहिका आणि रूग्णवाहिका असणारी कराड ही जिल्हय़ातील पहिली नगरपालिका ठरली आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, गटनेते सौरभ पाटील, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक फारूक पटवेकर, गजेंद्र कांबळे, अतुल शिंदे, मोहसीन आंबेकरी, सुहास जगताप, अंजली पुंभार, विद्या पावसकर, मिनाज पटवेकर, शिवाजी पवार, शिवराज इंगवले, जयंत बेडेकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बाधित रूग्णांना सेवा देण्यासाठी रूग्णवाहिका तसेच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शववाहिका खरेदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 35 लाख रूपये खर्चून ही दोन्ही वाहने पालिकेने खरेदी केली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून शहरवासियांसाठी सेवा देण्यात येणार आहे. फोर्स कंपनीची रूग्णवाहिकाही पालिकेकडे दाखल झाली आहे.
Previous Articleबेळंकीत पॉझिटिव्ह महिलेनेच वाढली पंगत, जेवलेल्यांचा शोध सुरू
Next Article मिरज कोविड रुग्णालयात मिळणारे जेवण निकृष्ठ दर्जाचे








