कराड / प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे गॅरेज व्यावसायिकांमध्ये किरकोळ कारणावरूनझालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आला. आशियाई मार्गालगत पाचवड फाटा (ता. कराड) येथे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी सकाळी कराड पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.
रवी यादव (वय 24 रा. उत्तर प्रदेश) असे खूनझालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे गॅरेज व्यावसायिक रामप्रसाद व रवी यादव (दोघे रा. उत्तर प्रदेश) यांच्या शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पाण्याची मोटर चालू बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळीरवी यादव याला लाकडी दांडक्याने मारहाण झाली. गंभीर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.









