मृत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील; नगरला लग्नासाठी जाताना काळाचा घाला, एकजण गंभीर जखमी, कारचा चक्काचूर
प्रतिनिधी / वहागाव, उंब्रज:
कराडपासून 7 किलोमीटर अंतरावर आशियाई महामार्गावर वहागाव (ता. कराड) गावच्या हद्दीत स्विफ्ट कारला झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून अपघातातील मृत सिंधुदुर्ग जिह्यातील रहिवासी आहेत. नगर येथील एका मित्राच्या लग्नग्नाला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. भीषण अपघात, घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातात स्विफ्टचा चालक निलेश चिंतामणी मोडकर (वय 30, रा. मापन खवणे, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), मनोज मनोहर परब (वय 35, रा. बाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), अंकुश देवबा शिंदे (वय 25, रा. कुंभारभाट), भरत महाळू बोडेकर (वय 30, रा. नापणे, वैभववाडी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रोशन रामा वरग (वय 26, रा. मिरखे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे गंभीर जखमीचे नाव असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग जिह्यातील पाचजण मित्राच्या लग्नग्नासाठी स्विफ्ट कार घेऊन नगरला निघाले होते. कोल्हापूर ते पुणे जाणाऱया लेनवर आशियाई महामार्गावरून प्रवास करताना स्विफ्ट कार (एम एच 07- एबी 5610) ला रविवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास वहागावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर एकास उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. तर अन्य जण 1 गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची तुफान गर्दी होती. कार, जीपसारख्या लहान वाहनांची टोलनाक्यावरही दिवसभर वर्दळ होती. दरम्यान दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे भरधाव वेगाने स्विफ्ट कार निघाली होती. कारवरील चालकाचे नियत्रंण सुटल्याने वहागाव येथील हॉटेल जयभवानीजवळ कार रस्ताच्या दुभाजकाला जोरात धडकली व रस्ता ओलांडून पुणे-कराड या लेनवर उलटय़ा दिशेला आली. त्यावेळी त्या लेनवर भरधाव वेगात असणाऱया अवजड वाहनाने धडक दिल्याने स्विफ्टचा चक्काचूर झाला. टफ उडून गेला तसेच कारमधील चौघांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एकाचे धड मानेपासून वेगळे झाले होते तर एकाच्या डोक्याची कवटी उडून रस्ताकडेला पडली होती. संपूर्ण कार रक्ताने माखल्याने घटनास्थळीचे मन हेलावून टाकणारे होते. वास्तविक पाचजण मित्राच्या लग्नग्नासाठी परजिल्हय़ात चालले होते. निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडेकर यांच्यावर काळाने घाला घातला. भीषण अपघातात गंभीररित्या जखमी होऊन चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर रोशन रामा वरग यांच्यावर कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच तो कोतवाल असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.
स्पिडोमीटर 165 ला थांबला
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन अपघातग्रस्त स्विफ्ट कारची पाहणी केली त्यावेळी कारचा स्पिडोमीटर 165 च्या स्पीडला अडकला असल्याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याच्या सपोनि जयश्री पाटील यांनी दिली. यामुळे घटनेवेळी अपघातग्रस्त कार भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
अज्ञात वाहनाचे सेफ्टीगार्ड घटनास्थळी
अपघातग्रस्त स्विफ्ट कारच्या समोर पिवळ्या रंगाचे रेडियम असलेले मोठय़ा ट्रकला असणारे सेफ्टी गार्ड पडल्याचे दिसत होते. यामुळे कारची धडक ही पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणाऱया मालवाहतूक ट्रकला बसली असण्याची शक्यता घटनास्थळी व्यक्त होत होती. यामुळे तासवडे टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज वरून ट्रकचा छडा लागल्यावरच घटना कशी घडली? याबाबत उलगडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी भयावह स्थिती
दरम्यान अपघातग्रस्त स्विफ्ट कार वेगात होती. त्यामुळे कार महामार्गावर डिव्हायडरला धडकून दुसऱया लेनवर आली. कारचा टफ पूर्णपणे उद्धवस्त होऊन चक्काचूर झाला होता. तसेच कारमध्ये तिघांचे मृतदेह अडकले होते. हे चित्र पाहणाऱयांचे हृद्य हेलावले. अपघातातील तिन्ही व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे घटनास्थळी विदारक चित्र होते. चालकाच्या सीटवर असणाऱया व्यक्तीचा चेहराही ओळखता येत नव्हता. यावरून अपघाताची भीषणता समोर येत होती.
कराडजवळ अपघातांची मालिका
लॉकडाऊन शिथिल होत असताना लोक पर्यटनाला बाहेर पडत आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून अपघात होऊ लागले आहेत. गेल्या रविवारी पाचवड फाटा येथे पुण्याच्या इनोव्हा कारचा अपघात होऊन पुण्यातील 3 तरूण ठार तर 9 जण जखमी झाले होते. आज वहागावजवळ अपघात होऊन सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 4 जण ठार झाले आहेत.









