प्रतिनिधी / कराड :
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये लहान शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱया कराड नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणचे नोडल ऑफिसर रफीक भालदार यांची ऑनलाईन विशेष मुलाखत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शहरी व पर्यावरण विभागाने घेतली. मलेका अन्सारी यांनी ऑनलाईन विशेष मुलाखत घेत कराड पालिकेच्या उपक्रमांबद्दल जाणून घेतले.
कराड शहराने 2020 स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी शहराने राबविलेले विशेष उपक्रम तसेच 2021 ची तयारी याबाबतची माहिती यावेळी आर. डी. भालदार यांनी दिली. शहरातील कचरा कशा पध्दतीने गोळा केला जातो, कचर्यावरील प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन, बायोमेडिकल प्लॅन्ट, घरगुती खत तयार करणे, घर टू घर केलेला सर्व्हे, स्वच्छतेसाठी महिलांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद व सहभाग तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठीचे पुढील नियोजन याची सविस्तर माहिती भालदार यांनी दिली. यामध्ये भालदार यांची मुलाखत चांगली झाली असल्याबद्धल अभिनंदन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व राज्यस्थानमधील सर्व नगरपालिका व महानगरपालिकांच्या अधिकाऱयांचा या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग होता.








