कसबा बीड ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते कामांना सुरुवात
कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कसबा बीड ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते कामांना आज आमदार पी. एन. पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्या प्रसंगी राहुल पाटील यांनी बोलताना वर्षभरामध्ये संपूर्ण देशात कोरोना रोगाने हाहाकार माजवला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांना रोजगारापासून वंचित रहावं लागलं, याची झळ देशातील सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच बसलेली आहे. पण आता हळूहळू आपण सोशल डिस्टंसिंग, मास्क आधी नियमांचा पालन करत कोरोना रोगास हद्दपार करण्यासाठी जनतेने खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य दिले आहे. इथून पुढे करवीर विधानसभा मतदारसंघ विकास कामांचे मॉडेल बनवू ,असे राहुल पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले .
आमदार पी एन पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील आणि पंचायत समिती करवीर सदस्य म्हणून मी स्वतः सर्व एकत्र येऊन विकास कामांचा शुभारंभ करत आहोत,असे राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
कसबा बीड ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी 13 लाख 75 हजार रुपयाचा निधी मंजूर करून रस्ता कामास शुभारंभ झाला. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सत्यजित पाटील यांनी आमदार पी एन पाटील साहेब यांच्या सहकार्याने या कामास सुरवात झाली आहे.गेली अनेक वर्ष कसबा बीड अंतर्गत रस्त्यांना निधी न मिळाल्याने विकासापासून वंचित राहिला होता. पण आमदार पी एन पाटील साहेब यांच्यामुळे ते शक्य झाल्याने आनंद होत आहे, असे सांगितले. या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच दिनकर सूर्यवंशी, आत्माराम पाटील, मुकुंद पाटील, ग्रामसेवक संदीप पाटील, सरदार पाटील, श्रीनिवास पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ, आदी मान्यवर उपस्थित होते.









