उचगांव /वार्ताहर
गांधीनगर(ता.करवीर ) पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावामध्ये कोरोना ८०० ते ८५० पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा गाठला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समुह संसर्गाचा धोका जास्त असल्यामुळे प्रत्येकाचा मास्क तसेच शासनाने जे व्यावसायिकांना नियम घालून दिले आहेत त्याची प्रशासनाने योग्य दखल घेऊन कडक अंमलबजावणी करावी.याबाबतचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले. तसेच उचगाव,गडमुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड येथील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली राजू यादव म्हणाले जिल्हाधिकारी जर रस्त्यावर उतरून एखाद्या दुकानावर कारवाई करत असतील तर अन्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी का करू नये. सर्व प्रशासनाने त्यांचा आदर्श घ्यावा.प्रशासनाने मास्क नसणे, सामाजिक अंतर नसणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी तरच आपण कोरोना सारख्या महाआजाराचा समुह संसर्ग रोखु शकतो.
यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, विक्रम चौगुले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, गांधीनगर शहरप्रमुख दिलीप सावंत, वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटाणी, बाबुराव पाटील, दीपक अंकल, किशोर कामरा, मनोज शिंदे, किरण शिंगे, राजेश सचदेव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Previous Article‘माझे कुटुंब’ मोहिमेचा कागदोपत्री खेळ
Next Article कोयना धरणातून पाऊण फुटाने विसर्ग









