प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर पश्चिम भागात विरशैव बँकेच्या एटीएम मोबाईल व्हॅनचे कौतुकास्पद कार्य सुरु झालंय. संचारबंदीच्या काळात बँकेच्या ग्राहकांना दैनंदिन खरेदीसाठी आवश्यक पैसे उपलब्ध करुन देण्यासाठी वीरशैव बँक, कोल्हापूर यांच्यावतीने करवीरच्या पश्चिम भागात एटीएमधारकांना व ग्राहकांना एटीएम मोबाईल व्हॅनद्वारे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक ग्राहकांना याचा लाभ घेता आला. शिरोली दुमाला (ता. करवीर) येथे गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते या एटीएम मोबाईल व्हॅन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गोकुळचे माजी चेअरमन व सदस्य विश्वास पाटील म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत बँकेतून पैसे काढणे लोकांना कठीण होऊ लागले आहे. ग्रामीण भागात एक तर एटीएम कमी आहेत आणि आहे त्यात पैसे नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज ओळखून वीरशैव बँकेने या उपक्रमाद्वारे चांगली सेवा दिली असल्याचे गौरवोद्गार काढले.
वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे म्हणाले, सर्व बँकांच्या एटीएमधारकांचा विचार करुन त्यांची या संचार बंदीच्या काळात आर्थिक गैरसोय होऊ नये, याकरिता वीरशैव को-ऑप. ( मल्टि-स्टेट ) बँकेच्या या उपक्रमाचा शहराबरोबरच ग्रामीण भागालाही याचा विशेष लाभ होत आहे.
मंगळवारी वीरशैव बँकेच्या एटीएम मोबाईल व्हॅनद्वारे शिरोली दुमाला, बीडशेड, कसबा बीड, महे, कोगे, पाडळी खुर्द, बालिंगा येथील गावातील एटीएमधारकांना या सेवेचा लाभ झाला.
शिरोली
दुमाला येथे व्हॅन सेवेच्या
उद्घाटनप्रसंगी सरपंच रेखा
मच्छिंद्र कांबळे, उपसरपंच
सरदार पाटील, माजी
सरपंच नंदकुमार पाटील,
एस.के.पाटील,
माधव पाटील, राजीवजी
सूतगिरणीचे संचालक बाजीराव
पाटील, रंगराव पाटील,
बलभीम विकास संस्थेचे
चेअरमन राहुल पाटील, सचिव
संजय पाटील, ग्रामपंचायत
सदस्य सरदार पाटील, रंगराव
माळी, मच्छिंद्र
कांबळे आदी उपस्थित होते.








