प्रतिनिधी / कसबा बीड
कसबा बीड तालुका करवीर येथील बीड शेड, सडोली दुमाला, गर्जन व पासार्डे येथील चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने करवीर पश्चिम भागाने सुटकेचा निश्वास सोडला. बीड करवीर येथील चौघांना कोरोणा पॉझिटिव्ह आल्याने करवीर पश्चिम भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तेव्हापासून या भागामध्ये कडक लाकँ डाऊन पाळण्यात आले आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते.त्यावेळी त्यांचा स्व्याब घेतला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त होऊन त्यामध्ये ते चार जन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे करवीर पश्चिम भागात कोणीही पॉझिटिव्ह राहिले नाही .ही सर्वांसाठी समाधानाची बाब आहे. अशी माहिती तलाठ्यांनी दिली.








