कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्याना 3 कोटी 95 लाख 64 हजार 800 रुपये मंजूर झाले असून ही रक्कम लवकरच संबंधितांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. त्यांची दिवाळी गोड होणार आहे, अशी माहिती आमदार पी.एन.पाटील यांनी दिली.
कोरोना काळात करवीर तालुक्यामध्ये विविध योजनेअंतर्गत जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे दोन्ही योजनांचे अनुदान रखडले होते. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांच्या संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावण बाळ निराधार योजने अंतर्गत अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नव्हती. त्यासाठी करवीरचे आमदार मा. पी.एन.पाटील (सडोलीकर) यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा केला होता, त्याला यश येऊन ही रक्कम लवकरच सबंधिताच्या खात्यावर जमा होणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याना 90 लाख 59 हजार 100, संजय गांधी निराधार योजना अनुसुचित लाभार्थ्याना 30 लाख 46 हजार 100,श्रावण बाळ अनुदान योजना सर्वसाधारण लाभार्थ्यांना 1 कोटी 60 लाख 6 हजार, तर श्रावण बाळ अनुदान योजना अनुसूचित लाभार्थ्याना 1 कोटी 14 लाख 53 हजार 600 अशी सर्व रक्कम मिळून 3 कोटी 95 लाख 64 हजार आठशे इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकर जमा होईल असे आ.पाटील यांनी सांगितले.