मुसळधार पावसाने नद्यांचे पाणी पात्राबाहेर
चुये / प्रतिनिधी
हवामान खात्याने जाहीर केलेल्या रेड अलर्ट प्रमाणे आज करवीर तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने दिवसभर हजेरी लावली त्यामुळे शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले. तालुक्यातील दूधगंगा पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी वेगाने वाढल्याने पाणी पात्राबाहेर आले. सकाळपासून जोरदार वाऱ्यासह मुझळधार स्वरूपात पाऊस पडल्याने शिवार उडून भरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तरणा नक्षत्राच्या अंतिम टप्प्यात व म्हातारा (पुष्य )नक्षत्राच्या प्रारंभी जोरदार स्वरूपातपाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेले आठवडाभर रिमझिम स्वरूपात कोसळणार्या पावसाने दोन दिवसापासून आघाडी घेतल्यामुळे नदीपात्रात स्थिर झालेले पाणी दोन दिवसापासून वेगाने वाढत गेलेले आहे. एक सारखा वादळी वाऱ्यासह कोसळणार्या पावसामुळे नदीपात्र परिसरात झपाट्याने वाढ झालेली आहे.
बाचणी बंधारा ओव्हर फ्लो
गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीपात्राची पाणी पातळी वेगाने वाढली. त्यामुळे करवीर – कागल तालुक्याचा वाहतुकीचा प्रमुख मार्गअसलेले बाचणी धरण सलग दुसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी बंधार्यावरून पाणी बाहेर पडले.
भातरोप लावणीला वेग
भातरोपणीच्या लावणीसाठी. शिवारात अपेक्षित पाणी नव्हते त्यामुळे भातरोप लावणीच्या कामाला गती नव्हती मात्र दोन दिवसापासून झालेला पाऊसाने सर्वत्र पाणीच पाणी केल्याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोपलावणीच्या कामाला कोसळलेला पाऊस आधार देणारा ठरलेला आहे. त्यामुळे भात रोप लावणीला गती मिळाल्याचे चित्र शिवारात पहायला मिळाले आहे.









