राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी, स्वागताध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची यांची उपस्थिती
कोल्हापूर प्रतिनिधी
भारतीय संत परंपरेतील सर्व संत, महात्म्यांनी मानवतावादाचा पुरस्कार केला. मानवतेचा विचार दिला. विश्वची माझे घर…. असा संदेश देत संत ज्ञानेश्वरानी वसुधैव कुटुंबकमची संकल्पना मांडली. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरूनानक यांच्यासह संत ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानदेव यांच्यासह तुकडोजी महाराज सर्वांच्या सुखाचा विचार मांडला. वेद, उपनिषदांनी जीवनपद्धती शिकवली. अशा विशाल परंपरा असलेल्या संतांच्या विचार सर्व जगभर पोचविण्याच्या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाला करवीर नगरी कोल्हापूरमध्ये मंगळवारी प्रारंभ झाला. संतवाणीतून उमठलेल्या विचारांचा तरंग विविध मान्यवर अभ्यासक आणि साहित्यिकांच्या माध्यमातून परिसंवाद उमठले.
येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये मंगळवारी अमरवाणी इव्हेंटस् फौंडेशन आयोजित आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि इंडसमून मीडिया प्रा. लि. मुंबई प्रायोजित पहिले वि<श्वात्मक संत साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष ह. भ. प. न्यायमूर्ती डॉ. मदन महाराज गोसावी, संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्यासह ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ. अरूणा ढेरे, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडके, उर्वरीत वैधानिक महाविकास माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा समाधीस्थळी सोमवारी या संमेलनाची औपचारीक सुरूवात करण्यात आली होती. मंगळवारी उद्घाटनाचा मुख्य सोहळा व इतर कार्यक्रम झाले. पहाटे महालक्षीचे पूजन झाले. यावेळी प्रा. प्रकाश खांडके, रवि पाटील, मोहन तिवारी, अशोक जाधव, हेमसुवर्णा मिरजकर, समीरा गुजर उपस्थित होत्या. त्यानंतर गंथ दिंडी काढण्यात आली. कसबा बावडय़ातील पॅव्हेलियन ग्राऊंड येथून गंथ दिंडीला प्रारंभ झाला. भगवा चौक, लाईन बाजार मागे गंथदिंडी संमेलनस्थळी पोहचली. यामध्ये वारकऱयांसह धनगरी ढोल-ताशा वाजवणारे कलाकार, भरतनाटय़चा आविष्कार सादर करणाऱया युवती, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करणारे मावळे, पारंपरीक झिम्मा, फुगडीची आठवण करून देणाऱया युवती आणि संत मिराबाईच्या वेशभूषेतील तरुणी लक्षवेधी ठरल्या. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील विविध भागातून पुरूष, महिला वारकऱयांचा सहभाग होता.
संत शिरोमणी, विश्वात्मक संत जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण
संमेलनात आळंदी येथील शांतीब्रह्म ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर यांना संत शिरोमणी पुरस्काराने हस्ते गौरविण्यात आले. तर विश्वात्मक संत जीवन गौरव पुरस्काराने हरिव्दार येथील महंत ऋषीश्वरानंदजी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.
संत साहित्याचे विदेशी अभ्यासक ठरले आकर्षणचे केंद्रबिंदू
संत साहित्याचा अभ्यास करणाऱया परदेशातील अभ्यासकांची या संमेलनातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. अल्जेरियाचे झरफी एड्डा, युगांडाच्या ऍलिसन नुवाम्पायर, अफगाणिस्तानचे इरफान मोहम्मद अली, नायजेरियाचे मूर्तला अमिनू, इराणच्या पुनेह खाजेह हसनी रबारी आणि भारताचे डॉ. जिगर इनामदार यांनी आपले संत साहित्यावरील शोधनिबंध सादर केले. त्यांच्या संत विचार आणि आचाराविषयीच्या मांडणीने उपस्थितांना नवी अनुभूती मिळाली.
राज्यपालांची चित्रप्रदर्शनाला भेट
संमेलनास्थळी भारतीय संस्कृती, संत परंपरा, वारकरी संप्रदाय, वारी, सण, उत्सव, प्रवचन, कीर्तन, देव-देवता यावर आधरित चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये मान्यवरांची चित्र आहे. आंतरराष्ट्रीय चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दरम्यान, मुख्य सोहळय़ानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या चित्रप्रदर्शनाला भेट देवून पाहणी केली. कलाकारांचे कौतुक केले.
राज्यपालांनी साधला परदेशी अभ्यासकांशी संवाद
आपल्या बिझी शेडय़ुलमधून वेळ काढत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी परदेशातून या संत संमेलनासाठी आलेल्या संत साहित्याच्या अभ्यासकांशी संवाद साधला. त्यांच्या अभ्यास पद्धतीची माहिती घेतली. भारतीय संत आणि संत परंपरेविषयी त्यांची असलेली मतेही राज्यपालांनी जाणून घेतली.