जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय : प्रस्ताव तयार न करण्याची महसूल निरीक्षकांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मालमत्तांच्या घरपट्टीत 3 टक्क्मयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. पण सध्या वाढत्या महागाईमुळे शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने करवाढ नको, अशी मागणी होत आहे. त्यामुळे तूर्त करवाढ नको, जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर करवाढीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी महसूल निरीक्षकांना केली.
महसूल विभागाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली. यावेळी करवाढीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. सध्याच्या घरपट्टीवर 3 टक्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पण सध्या महागाईचा आलेख वाढत चालला आहे. यापूर्वी कोरोनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. तसेच करवाढ करू नये, अशा सूचना अर्थसंकल्प बैठकीवेळी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून करवाढीचा निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत करवाढीचा प्रस्ताव तयार करू नये, अशी सूचना महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी महसूल निरीक्षकांना केली.
दरवषी 3 ते 5 टक्के रवाढीचा आदेश
शहरात 1 लाख 40 हजार 587 मालमत्ता असून या सर्व मालमत्तांच्या घरपट्टीत 3 टक्क्मयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यापूर्वी दर तीन वर्षांनी घरपट्टी वाढ करण्यात येते. पण आता यामध्ये बदल करून दरवषी 3 ते 5 टक्के करवाढ करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे. त्यामुळे 3 टक्के करवाढ करण्याची तयारी महसूल विभागाने चालविली होती. पण जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर करवाढीचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितल्याने करवाढीच्या प्रस्तावाला तूर्तासा ब्रेक लागला आहे.
सध्या खातेबदलाच्या 590 फाईल्स महसूल विभागात रखडल्या आहेत. नागरिकांची कामे रखडल्याने तक्रारी वाढल्या आहेत.
त्यामुळे याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. खातेबदलच्या फाईल तातडीने निकालात काढण्याची सूचना आयुक्तांनी केली. पण सर्व फाईल्स महसूल उपायुक्तांच्या लॉग-इनमध्ये असल्याने महसूल उपायुक्तांनी मंजुरी देणे आवश्यक असल्याची माहिती महसूल निरीक्षकांनी आयुक्तांना दिली. त्यामुळे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांना बोलावून घेण्यात आले. तसेच सदर फाईल्स निकालात काढण्याची सूचना आयुक्तांनी केली. जर फाईल निकालात काढण्यास अडचण असेल तर मी निकालात काढेन, असे महसूल उपायुक्तांना सुनावले.
तसेच ई-अस्तीवर मालमत्तांच्या नोंदी तातडीने करण्याची सूचना आयुक्तांनी केली. सध्या नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे इ-अस्तीच्या नोंदी करण्याची सूचना आयुक्तांनी महसूल निरीक्षकांना केली. यावेळी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









