करमाळा/प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील एकाने बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. जळगाव शिवारात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीची माहिती अद्याप समजलेली नाही. मात्र त्याच्याकडील दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित व्यक्ती ही करमाळा तालुक्यातील असल्याचे समजत आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही करमाळा तालुक्यातील फिसरे किंवा त्याच्या जवळपासचा रहिवासी असण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्ती जळगाव व आजूबाजूच्या गावात काम करताना फिसरे व सिद्धटेक या ठिकाणचा असल्याचे सांगितले होते, असे सांगितले जात आहे, याचा तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस हे करत आहेत.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीकडे करमाळा तालुक्यातील ज्योतिराम मस्के यांच्या मालकीची एमएच ४५ पी ८९५८ या क्रमांकांची दुचाकी आढळून आली आहे, अशी माहिती आष्टी पोलिसांनी दिली आहे. संबंधित मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन आष्टी पोलिसांनी केले आहे.