पोलिस प्रशासनाने वाचवले प्राण
प्रतिनिधी / करमाळा
स्वप्नील लोणकर याची आत्महत्या ही या सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे झाली, हे गृहीत धरून त्याचा निषेध म्हणून आज (ता.5) करमाळा तालुक्यातील महेश घरबुडे तसेच शर्मिला येवले व अन्य काही विद्यार्थ्यांनी गणिमिकावा करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले व कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजी करत, उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले, याप्रसंगी पोलिसांची चांगलीच पळापळ झाली, अचानक विद्यार्थ्यानी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासन अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली घोषणाबाजी केल्यामुळे अख्खे कार्यालय दुमदुमून गेले. एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे व शर्मिला येवले यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनकरत्यांच्या म्हणण्यानुसार हे आघाडी शासन अस्तित्वात आल्यापासून एमपीएससीद्वारे शासकीय नोकरी मिळविणे स्पर्धा परीक्षार्थींना दिवास्वप्नच बनून राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून या शासनाने फक्त एकच राज्यसेवेची परीक्षा घेतली आहे.
कोरोना, मराठा आरक्षण, तर कधी शासकीय खर्चात कपात असे कारण देऊन विविध शासन आदेश काढत सगळ्या भरती प्रक्रिया बंद करून टाकल्या आहेत. महापरीक्षा पोर्टल बंद करून आपण परत त्याच प्रकारच्या भ्रष्ट आयटी कंपन्यांना गट-क आणि गट-ड च्या परीक्षा देऊन विद्यार्थांचा भ्रमनिरास केला आहे. करोनामूळे आधीच हवालदिल असलेला विद्यार्थी आपल्या या सर्व निर्णयामुळे हा नैराश्यात गेला आहे, यामुळेच महाराष्ट्रात कितीतरी स्पर्धा परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारकडे आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्रालयावरून ऊडी मारू असा इशारा यावेळी महेश घरबूडे यांनी दिला.
यावेळी त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
१) एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.
२) एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.
३) विविध परीक्षेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या देण्यात येऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या.
४) सरळसेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्या मार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी.
गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचे मुल-मुली आपल्या कडे खूप आशेने या मागण्या करत आहे. आपल्याला विनंती आहे की या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. अशी मागणी शर्मिला ऐवले या विद्यार्थिनीने केली यावेळी करमाळा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील आणी उभ्या महाराष्ट्रातून आलेले आनेक विद्यार्थी या आंदोलनात सामिल होते वेळेत पोलिस पोहचले नसते तर आज आणखी ऐका विद्यार्थ्याचा बळी गेला आसता सुरक्षा जाळी लावल्यामुळे शर्मिला ऐवले ही विद्यार्थीनी वाचली. श्री.घरबुडे हे करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील रहिवासी असून ते स्वतः एम.पी.एस.सी ची परीक्षा देत आहेत.