प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहरासह तालुक्यात कोरोनाचे वातावरण शिगेला पोहोचले असून यावर तातडीची उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, ही लस कधी उपलब्ध होणार, याकङे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण ४१९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ७० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ४० पुरुष तर ३० महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १४० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात २७९ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज शहर व ग्रामीणभागातील कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढली असून नागरिकांनी याचे गांभीर्य घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात अजूनही शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील आलेले नागरिक तोंडाला मास्क न वापरता शहरात खुले आम फिरत आहेत.
त्यामुळे अशा व्यक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे कायम उल्लंघन होत आलेले आहे. त्यामुळे यापुढे तरी कोरोना या महारोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सावधान राहणे गरजेचे आहे. आज जेऊर (ता.करमाळा) येथील ९० वर्षाच्या पुरुषाचे निधन झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत तालुक्यात एकूण २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४४७ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील २८ कोरोनाबाधीत.
कुंकू गल्ली २ पुरुष, सुमंतनगर १ पुरुष, १ महिला, कानाडगल्ली १ पुरुष, २ महिला रेस्टहाऊस १ पुरुष, कृष्णाजीनगर १ पुरुष एम.एस.ई.बी. १ पुरुष, १ महिला बालाजीनगर १ पुरुष, गुजरगल्ली १ महिला ,हिरडे प्लॉट २ महिला, मेनरोड १ महिला, शिवाजीनगर १ पुरुष, १ महिला, गणेशनगर १ पुरुष, २ महिला शिंदे हॉस्पिटल १ पुरुष, सिद्धार्थनगर १ महिला, किल्ला विभाग १ पुरुष विद्यानगर १ पुरुष सावंतगल्ली १ पुरुष
ग्रामीण भागातील ४२ कोरोनाबाधीत.
कात्रज १ महिला घोटी १ पुरुष, १ महिला, देलवडी १ पुरुष, रावगाव १ पुरुष, आळजापूर १ पुरुष, धायखिंडी १ महिला, शेटफळ १ पुरुष, १ महिला, हिसरे १ पुरुष कुंभेज १ महिला, वांगी नं ३ (६ पुरुष) केम १ महिला वीट २ पुरुष १ महिला, शेलगाव वांगी ८ पुरुष, ८ महिला, वांगी नं १ (२ पुरुष,१ महिला)
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









