ग्रामीणभागात मात्र ७ पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज (ता.९) एकूण १३३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ५ पुरुष तर २ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात ३१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या परंतु यामध्ये एकाही जणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला नाही, शहरातील आजच्या तपासणीत एकही रुग्ण आढळलेला नाही ही बाब खूपच महत्वाची ठरलेली आहे. हळूहळू ही संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे, आज ग्रामीण भागात १०२ अँटिजिन रॅपिड टेस्टमध्ये ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज १७ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १८८० जणांना डिस्चार्ज दिला आहे. १४९ जण उपचार घेत असून करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या २०५७ वर जाऊन पोहोचली आहे. आज करमाळा शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. ग्रामीण भागातील ७ कोरोनाबाधीत. साडे – १ पुरुष, चिखलठाण – २ पुरुष, १ महिला, शेटफळ १ पुरुष, वाशिंबे – १ महिला, वडगाव – १ पुरुष
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









