प्रतिनिधी / करमाळा
करमाळा येथे आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी व आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पोलिसांनी रस्त्यावर अडवून धक्का बुक्की केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांचे नेतृत्वाखाली पुतळा दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिषेक आवाड, आदी जण उपस्थित होते. यावेळी उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की युपीतील हुकूमशाही योगी सरकारने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी ना केलेल्या धक्का बुक्कीमुळे सरकारची निष्क्रियता दिसून येत आहे.
यु पी सरकारने किती ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी गांधी कुंटूबानी देशासाठी केलेला त्याग बलिदान देशातील जनता कदापी विसरणार नाही, त्यामुळे या देशातील सर्व जनता काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि अशा या हुकूमशाही योगी सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर निषेध करतो, असे ठणकावून सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









