प्रतिनिधी / करमाळा
करमाळा येथील तालुका लोकन्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ४५१ खटले तडजोडीने निकाली निघाले आहेत. तर ३७ लाखांपेक्षा जास्त वसुली रक्कम जमा झाली आहे.
आज (ता.२५) या लोकन्यायालयाचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश प्रशांत घोडके यांचे हस्ते झाले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री हे होते. वकील संघाच्या अध्यक्षा ॲड.सविता शिंदे, उपाध्यक्ष ॲड.सचिन लोंढे सचिव योगेश शिंपी यासह ॲड.सुखलाल लूणावत, एन.डी.रोकडे, एम.डी.कांबळे, एस.पी.रोकडे, बलवंत राऊत, पी.के.पवार आदीजण उपस्थित होते.
आजच्या लोकन्यायालयात प्रचंड गर्दी झालेली पहायला मिळाली, यामध्ये ग्रामपंचायत वसुली, पंचायत समिती घरकुल प्रकरणे, बँकेची वसुली व नियमित खटले, लॉकडाऊनमधील खटले यामुळे न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झालेली होती. आजच्या लोकन्यायालयात मिटलेली प्रकरणात न्यायालयातील प्रलंबित खटले- 77, ग्रामपंचायत वसुली-327, व बँकेचे-47 असे 451 खटले निकाली निघाले.
तर ग्रामपंचायत विभागाची 26 लाख 66 हजार 310 रूपये तर न्यायालयीन वसुली 11 लाख रूपये अशी साडे 37 लाख 16 हजार 310 रूपये वसूल झाला आहे. ग्रामपंचायत प्रकरणी न्यायालयाने नोटीस काढल्याने चांगली वसूली झाली. यावेळी सहाय्यक अधीक्षक श्री.सरसंबी, एस.बी.कांबळे, विधीसेवा समितीचे रामेश्वर खराडे तसेच एस.आर.ढेरे, एम.कांबळे, सि.जी.चौरे यांचे लोकअदालतच्या कामी मोलाचे सहकार्य लाभले.









