प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील आज दुपारनंतरचा पाऊस हा अनेक वर्षानंतर पासूनचा असून तब्बल पाच तास संतधार असल्याने सर्वदूर पाणी दिसून आले. परतीच्या मुसळधार पावसाने नागरिक हैराण झालेले असून मुसळधार पावसामुळे शेती बरोबरच इतर ही नुकसान झालेले आहे.
ठिकठिकाणी पाणी साचून राहिलेले शेती, घरांमध्ये, दुकानांमध्ये मुसळधार पावसाने पाणी साठलेले आहे.
तालुक्यातील काही मार्ग पाण्याखाली गेलेले आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केलेली आहे परंतु पेरणी वायफळ जाणार असल्याचे बोलले जात आहे. आजच्या पावसाने जेऊर मधील भुयारी मार्ग हा पाण्याखाली गेलेला असून भुयारी मार्ग प्रशासनाने बंद केलेला आहे. भुयारी मार्गानं प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









