तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात आज (ता.३) एकूण १८६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ५२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाटयाने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज करमाळा शहरात ८१ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यामध्ये १९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ग्रामीण भागात १०५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात ३३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज तब्बल २१ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ४६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून त्यांना घरी सोडले आहे. सध्या ३०० जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८२ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
करमाळा शहरातील १९ कोरोनाबाधित, कृष्णाजीनगर २ पुरुष, २ महिला, दत्तपेठ १ पुरुष, कुंकूगल्ली २ पुरुष, जामखेड रोड १ पुरुष, महेंद्रनगर १ पुरुष, २ महिला, संभाजीनगर १ पुरुष, १ महिला, मेनरोड १ पुरुष, गणेशनगर १ पुरुष, २ महिला, घोलपनगर २ पुरुष
ग्रामीण भागातील ३३ कोरोनाबाधित, जेऊर २ पुरुष, वडगाव १ पुरुष, देवीचामाळ १ पुरुष, जातेगाव १ महिला, चिखलठाण १ पुरुष, पोथरे ३ पुरुष, ९ महिला, कंदर ३ पुरुष, १ महिला, सांगवी ५ पुरुष, ५ महिला.