प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील कोरोणाबाधितांच्या संख्याची आकडेवारी वरचेवर कमी होत असल्याने, यामुळे भयभीत असलेला तालुका कोरोनामुक्त झाला कि काय असा आशावाद व्यक्त होत असून एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण पहावयास मिळू लागले आहे.
करमाळा शहर व तालुक्यात आज एकूण ४३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ६ पुरुष तर १ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात २० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात २३ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज २५ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत १७७३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या २००५ वर जाऊन पोहोचली आहे.
करमाळा शहरातील ५ कोरोनाबाधीत
सिद्धार्थनगर – १ पुरुष, शाहूनगर – १ पुरुष, एम आय डी सी – २ पुरुष, १ महिला
ग्रामीण भागातील २ कोरोनाबाधीत
अंजनडोह – १ पुरुष, मोरवड – १
Previous Articleपंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासनाकडून तंबाखू, सुपारी जप्त
Next Article नळी येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई









