प्रतिनिधी /करमाळा
करमाळा तालुक्यात आज एकूण १४३ ॲटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात ३ पुरुषांचा समावेश आहे.
करमाळा शहरात आज ८ ॲटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून, यामध्ये कोणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही. तर आज ग्रामीण भागात १३५ ॲटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या असून यात ३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात देवळाली येथील १ पुरुष, पोथरे येथील १ पुरुष, मांगी येथील १ पुरुष अशा ३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज ५ जणांना उपचार करून घरी सोडले असून आजपर्यंत २६४३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. ३२ जण उपचार घेत असून करमाळा तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या २७१२ वर जाऊन पोहोचली आहे.
Previous Articleग्रामपंचायती निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज स्विकारणार
Next Article पुणे विभागातील 5 लाख 36 हजार 690 रुग्ण कोरोनामुक्त!









