नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका, अपहरणकर्त्यास शाहूपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रतिनिधी / सातारा
शहरातील करंजे पेठ येथील अल्पवयीन मुलीला या पेठेतील इसमाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्या इसमाला पकडून ठेवत याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले आहे. विशाल बाळकृष्ण दरवडे (वय 32) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी करंजे पेठेतून पायी चालत निघाली होती. यावेळी याच पेठेत राहत असलेला विशाल दरवडे याने तिचा पाठलाग केला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने मुलीला उचलून खांद्यावर टाकले. आणि स्वतःच्या घरी नेऊ लागला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा करत त्याच्या घरी पोहोचले. यावेळी तो मुलीला घरात घेऊन गेला होता. नागरिकांनी त्याच्या ताब्यातून मुलीला सोडवले. आणि मुलीला का, कशासाठी पळवून नेत होतास अशी विचारणाही केली. परंतु त्याने काही उत्तर दिले नाही. त्याला थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे मुलीच्या नातेवाईकांनी घडलेला प्रकार सांगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
परिसरात भीतीचे वातावरण
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे करंजे पेठ व आसपासच्या परिसरात या घटनेची माहिती पसरली. तो नक्की काय व कसा प्रकार घडला याची कोणालाच मिळाली नाही. यामुळे उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









