प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा जतन करण्याच्या असुशंगाने शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तुंचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याअंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया कमानी हौदची ही स्वच्छता करून येथील कारंजे पुन्हाने सुरू करण्यात आले होते. पण हे कारंजे सुरू करून एक महिना होण्यापुर्वीच आता हे कारंजे बंद ठेवण्यात आले आहेत.
फेबुवारी महिण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन हे कारंजे सुरू करण्यात आले होते. लायटींग इफेक्ट असणाऱया या कारंज्यामुळे शहराच्या सौदर्यात आणखीनच भर पडली होती. बऱयाच सातारकरांनी आवर्जुन या कामानी हौदच्या कारंजे पाहण्यासाठी भेटी देत होते. पण आता गेल्या काही दिवसांपासुन हे कारंजे बंद ठेवण्यात आले आहेत.
लाखो रूपयांचा निधी खर्चुन या ठिकाणचा गाळ काढण्यात आला होता. याकरीता बऱयाच दिवसांचा कालावधीही लागला होता. तसेच येथे सुरू करण्यात आलेल्या कारंजेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेने जाळी ही बसविण्यात आली आहे. इतका सर्व आटापिटा करून हे कारंजे अध्याप बंद असल्याने मात्र सातारकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कारंजे हे नियमीत सुरू असायला हवे
कमानी हौदाचे कारंज्यामुळे शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती. पण हे कारंजे बंद असल्याचे कळल्याने नागरीकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत संबंधीतांना जाब विचारणार असुन लाखो रूपये खर्च करून सुरू करण्यात आलेले हे कारंजे नियमीत सुरू असायलाच हवे. तसेच येथील सौंदर्यात भर पडण्याकरीता येथे ऍटीक लॅम्प बसविण्याचा सल्ला ही दिला होता. पण ते ही अध्याप बसविण्यात न आल्याने या बाबत जाब विचार आहे.
सिध्दी पवार
नगरपालिका बांधकाम सभापती








